SSC RESULT 2023 ; सौ. हि. भा. वरसकर वराडचा निकाल 100 टक्के

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 02, 2023 15:22 PM
views 76  views

मालवण : वराड ग्रामस्थ संघ,मुंबई संचालित,  सौ.हि.भा.वरसकर विद्यामंदिर व वराड कला वाणिज्य(सं) कनिष्ठ महाविद्यालयातून मार्च 23 च्या  SSC परीक्षेसाठी विद्यालयातून 25 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून विद्यालयाचा निकाल 100% लागला. या निकालामध्ये विशेष श्रेणी मध्ये 19 प्रथम श्रेणी मध्ये 05 व द्वितीय श्रेणी मध्ये 01 विद्यार्थी आहेत. 

प्रथम तीन क्रमांक गौरव यशवंत वराडकर 500 पैकी 470 गुण  94.00 %, द्वितीय क्रमांक ओंकार वसंत वराडकर 500 पैकी 459 गुण  91.80 % व तृतीय क्रमांक पार्थ सुनिल आळवे 500 पैकी 458 गुण 91.60 %मिळावीला आहे. 

वराड ग्रामस्थ संघ, मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे व संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शालेय समिती चेअरमन आप्पासाहेब परुळेकर व सर्व सदस्य. पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापिका सौ. प्रिया मयेकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.