
कुडाळ : माणगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. दुर्वा दिपक काणेकर ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा कुडाळ नगरपंचायतच्या भाजप नगरसेविका सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांनी केला आहे. विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी शिवसेनेला पराभवाची चव चाखवल्याशिवाय मतदार गप्प बसणार नाहीत, असाही दावा सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर यांनी केला आहे. तर आज जोरदार प्रचारात आघाडी घेत प्रत्येक प्रभाग त्यांनी पिंजून काढला आले. यावेळी कार्यकर्त्याची मोठ्या फौजफाटयासह पाचही प्रभाग पिंजून काढले. यावेळी सौ.प्राजक्ता शिरवलकर, सरपंच उमेदवार सौ.दुर्वा दिपक काणेकर, उमेदवार प्रसाद केसरकर, महिला उमेदवार, कुणाल कोरगावकर, दिपक काणेकर, बाळा कोरगावकर, हरीष भोगटे, रोशन केरकर, बाळा केरकर, प्रशांत केसरकर, नयन काणेकर, संचित दड्डीकर यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.