भव्य आंतरराज्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती !

आचरातील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिराचं आयोजन
Edited by:
Published on: October 09, 2023 12:33 PM
views 151  views

कुडाळ : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर गणेशोत्सवानिमित्त आयोजित भव्य आंतरराज्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. आंतरराज्य स्पर्धा दोन फेरीत होऊन 40 स्पर्धक सहभागी झाले होते.

आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वराच्या रंगमंचावर रविवारी रात्री ८ ऑक्टोबरला या भव्य एकेरी नृत्य स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक राजन पुजारे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी बाबू हडकर, विनोद गवळी, यल्लप्पा गुरव, जयदिप पाटील, दिपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, धुळाजी कर्पे, सुशील देसाई, शांताराम गुरव, आयोजक विजय (बाबू) कदम, लोककला नृत्य परीक्षक प्राची राणे, मुंबई तातू कुबल, अनिकेत घाडी, तेजस्विता केळुसकर, राजू घाडी, विकास गुरव, संतोष घाडी, निवेदक राजा सामंत, आचरा गावातील नागरिक रसिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंतरराज्य एकेरी नृत्य स्पर्धेत सिंधुदुर्गसह मुंबई रत्नागिरी बेळगांव विजापूर लांजा आदी भागांतून 40 स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धा दोन फेऱ्यात झाल्या. पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत 13 स्पर्धकांची निवड झाली. त्यातून सहा स्पर्धक विजेते ठरले. प्रथम मृणाल सावंत, द्वीतीय स्वरांगी खानोलकर तृतीय अभिषेक घवाळी,  उत्तेजनार्थ समर्थ गवंडे, आरव आईर, ईशा गोडकर यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक :- १५,०००/- व भव्य चषक व्दितीय क्रमांक :- १०,०००/- व चषक तृतिय क्रमांक :- ७,०००/- व चषक उत्तेजनार्थ ३ क्रमांक प्रत्येकी २,०००/- व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन  बाबू कदम यांनी केले होते निवेदन राजा सामंत यांनी केले सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.