ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये एमआरआय सुविधा उपलब्ध..!

Edited by: संदीप देसाई
Published on: August 31, 2023 20:17 PM
views 85  views

कोल्हापूर : रुग्णसेवेमध्ये वेळेला अत्यंत महत्व आहे, कोणत्याही क्षणी रुग्णाला उपचारांची गरज भासल्यास रोगनिदान सर्वात महत्वाचे मानले जाते. लवकर अचूक निदान झाल्यास तत्पर उपचार करणे सहज शक्य होते. ॲस्टर आधार हॉस्पिटल गेली अनेक वर्षे कोल्हापूर आणि पंचक्रोशीत रुग्णसेवेसाठी अग्रेसर हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते, सतत नवीन  स्पेशालिटीआणि सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा कोल्हापूरमध्येच उपलब्ध करण्यामध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मोठे योगदान आहे.  

हॉस्पिटलमध्ये एम आर आय सुविधेचे उद्घाटन कर्नाटक राज्यामधील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ सोमशेखर एस पी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सोमशेखर म्हणाले, "कोल्हापुर वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत प्रगत होत असून, ज्या सर्व आजारांसाठी मोठ्या शहरात जाणे पूर्वी गरजेचे होते त्या सर्व सुविधा आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध होणे हि अभिमानाची गोष्ट आहे. हॉस्पिटलच्या आतमध्येच असणाऱ्या या नवीन एम आर आय सुविधेचा रुग्णांना नक्की फायदा होईल."

ॲस्टर आधार हॉस्पिटलचे म्यानेजींग डायरेक्टर डॉ. उल्हास दामले म्हणाले, " नवीन मशीनद्वारे  एम आर आय सुविधा २४*७ सुरु असणे, तज्ज्ञ व अनुभवी रेडिओलॉजिस्ट यांची उपलब्धता, एम आर आय दरम्यान मशीनमध्ये असणारी ऑडिओ व्हिडीओ सुविधा ज्यामुळे रुग्णाला कमी मानसिक तणाव जाणवतो आणि अत्याधुनिक पॅक्स सुविधेमुळे रेडिओलॉजिस्ट एम आर आय जगभरात कुठेही पाहू शकतात ज्यामुळे अचूक व त्वरित निदान करणे सोपे होते. हॉस्पिटलमध्येच एम आर आय असणे हि रुग्णसेवेसाठी नक्कीच फायद्याची गोष्ट आहे."

एम आर आय सेवेच्या उदघाटनप्रसंगी ॲस्टर आधार हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर, रेडिओलॉजी विभागाचे डॉक्टर्स, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत शाह व इतर कर्मचारी उपलब्ध होते