श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे वार्षिक स्नेहसंमेलन थोड्याच वेळात !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 02, 2024 11:07 AM
views 180  views

कुडाळ : माणगाव येथील माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे वार्षिक स्नेहसंमेलन आज होत आहे. संस्थेचे अध्यक्ष सगुण धुरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे.

तर जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माणगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी मनिष दळवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशिलकुमार शिवलकर, निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर संस्था उपाध्यक्ष दत्ताराम जोशी, सचिव एकनाथ केसरकर, सहसचिव महेश भिसे, सीईओ लि.न.आकेरकर, महाविद्यालय संस्था प्रतिनिधी चंद्रशेखर जोशी, स्कूल कमिटी सदस्य विनायक नानचे, दत्तदिगंबर धुरी, अंतर्गत हिशेब तपासणी साईनाथ नार्वेकर, मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण हे उपस्थित असणार आहेत. थोड्याच वेळात ह्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे.