म्हापण ग्रामपंचायतीवर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत श्री.सातेरी,खवणेश्वर गाव विकास पॅनेलची बाजी!

Edited by: रुपेश पाटील
Published on: December 20, 2022 15:54 PM
views 547  views

संदीप चव्हाण

वेंगुर्ला :  प्रतिष्ठेच्या ठरलेल्या म्हापण ग्रामपंचायतीवर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत श्री.सातेरी,खवणेश्वर गाव विकास  पॅनलची  बाजी मारली.

गेली पाच वर्ष एक हाती सत्ता असलेल्या शिवसेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप पुरस्कृत श्री.शांतादुर्गा गाव विकास पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, कोणत्याही परिस्थितीत आपला सरपंच बसणार अशी आशाही व्यक्त केली जात होती. त्यानुसार गावोगावी प्रचार देखील केला गेला.मात्र कोणताही गाजावाजा न करता अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पॅनलने बाजी मारली .त्यामुळे पुन्हा एकदा म्हापण ग्रामपंचायतीवर भगवा फडकण्यात यशस्वी झाले. या ग्रामपंचायतीसाठी ११ सदस्य व सरपंच पदासाठी थेट निवडणूक झाली. या निवडणुकीत  सरपंच आकांक्षा विश्वनाथ चव्हाण यांना एकूण ८०० मते तर रिया राजीव चव्हाण यांना एकूण ५८६मते मिळाली, त्यामुळे आकांक्षा विश्वनाथ चव्हाण हि २१४ एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या.तर सदस्य:१-अविनाश खोत ,२ -सुषमा म्हापणकर ,३-प्राजक्ता सारंग, ४-श्रीकृष्ण ठाकूर ,५-सिया मार्गी ,६-गुरुप्रसाद चव्हाण, ७-अभय ठाकूर, ८-प्रशांती कोनकर ,९-गुरुनाथ मडवळ, १०-तन्वी चौधरी, ११ -मृणाली मेस्त्री. विजयी झाले आहेत.