
दोडामार्ग : सासोली येथील सामायिक जमिनीच्या मालकी क्षेत्रातील काजू बागेत काही धन दांडग्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सासोली येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला रुक्मिणी कृष्णा पिळणकर यांनी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होत.
सासोली येथील वडिलोपार्जित असलेल्या काजूच्या बागेत रुक्मिणी पिळणकर यांची वडिलोपार्जितच काजू बागायत आहे. त्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंब उदर निर्वाह होतो. मात्र काही धन दांडग्यांनी त्यांच्या वहिवाट असलेल्या या बागायतीत अतिक्रमण करून काजूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतकचं नव्हे तर ती काजू झाडे तोडल्याने रुक्मिणी पिळणकर यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने त्यांचा उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण करून आर्थिक नुकसान करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पिळणकर यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.