सावंतवाडी तलाठ्यांचं आंदोलन ; अतिरिक्त भार असलेली 22 कार्यालय राहतील बंद

तहसीलदारांकडे चाव्या सुपूर्द
Edited by: जुईली पांगम
Published on: October 16, 2023 21:38 PM
views 499  views

सावंतवाडी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडलंय. सावंतवाडी तलाठी संघाचाही या आंदोलनात सहभाग आहे. याचपार्श्वभूमीवर अतिरिक्त सजाचा कार्यभार असलेल्या तलाठी कार्यालयाच्या चाव्या सावंतवाडी तहसीलदारांकडे सोपवण्यात आल्या. तसंच याबाबतचं निवेदनही तहसीलदारांना देण्यात आलं. त्यामुळे 22 तलाठी कार्यालयं बंद राहणार आहेत. 

 रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने ई फेरफार, ई पिक पाहणी, ई चावडी यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यात आली होती. मात्र या मागण्या पूर्ण न झाल्याने हे आंदोलन छेडण्यात आलंय. केवळ नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक विषयक कामे वगळून इतर कमकाज रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचा आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय.


ही 22 कार्यालय राहतील बंद 

सोनुर्ली, क्षेत्रफळ, कुंभार्ली, डेगवे, रोणापाल, कास, विलवडे, कवठणी, मडूरे, पाडलोस, कारिवडे, केसरी, तळवणे, तिरोडा, भटपावणी, चौकुळ, सावंतवाडी ग्रामीण, डिंगणे - गाळेल, आरोस - न्हावेली, वेर्ले, कोलगाव - निरुखे, तळवडे - कुंभारवाडा  

सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन देताना रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ अध्यक्ष सत्यवान गवस, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सरचिटणीस महादेव गवस, सावंतवाडी अध्यक्ष स्वप्नील सोनसूरकर  आणि सावंतवाडी तालुक्यातील तलाठी उपस्थित होते.