
सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद बजरंगदल सावंतवाडी, शिवप्रेमी व गोरक्षक सिंधुदुर्गच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आलं होत. या निमित्ताने सायंकाळी कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
भगव वादळ या रॅलीमुळे शहरात पसरल होत. कोकण कॉलनी येथील शिवपुतळ्याला अभिवादन करून ही रॅली मार्गस्थ झाली. माजी मंत्री आम.दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी या रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत ही रॅली गांधी चौक येथील सभास्थळी दाखल झाली.
यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, बजरंग दलाचे विवेक कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब, अन्नपूर्णा कोरगावकर, सुधीर आडीवरेकर, चिन्मय रानडे, मोहीनी मडगावकर, स्वागत नाटेकर, अजय गोंदावळे, दिनेश गावडे, कृष्णा धुळपनवर, किशोर चिटणीस आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.