
वैभववाडी : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. उंबर्डे ते लोरे व लोरे ते वैभववाडी अशी रॅली पार पडली. या रॅली मध्ये मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार नितेश राणे देखील रॅलीत सहभागी झाले होते. लोरे येथील शिवाजी महाराज चौकेतून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार नितेश राणे आगे बढो अशा घोषणा युवकांनी दिल्या.
यावेळी वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे, रोहन रावराणे, बबलू रावराणे, व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.