मोती तलावाचे सौंदर्य जपा, डपक बनवू नका : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: May 29, 2023 10:52 AM
views 100  views

सावंतवाडी: मोती तलावाचे बांधकाम करत असताना त्याचे सौंदर्य जपा, तलावाचे डपक बनवू देऊ नका असं विधानं माजी नगराध्यक्ष बबन सागावकर यांनी केल आहे. सध्यस्थितीत गाळ उपसा मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर बबन साळगावकर यांनी हे विधान केलं आहे.

सावंतवाडी शहरातील मोती तलाव मजबुतीकरणाचे काम घिसाड घाईने सुरू आहे. बांधकाम करत असताना मोती तलावाचे सौंदर्य जपलं जात नसून बांधकाम खात्याचे अधिकारी त्याचे डिझाईन न बनवता फक्त मजबुती करण्याची भिंत घालत आहे. तसेच या दर्जाकडेही कुणाचाही लक्ष नाही. तलावाचे डबक बनवण्याचे काम सुरू आहे. तलाव सर्व बाजूंनी लहान लहान करत त्याच डबक बनत चालला आहे. मोती तलाव हे शहराचं 'हार्ट ऑफ द सिटी' म्हणून मानलं जातं. या तलावाचं बांधकाम करत असताना त्याचा गोलाकार जपणं आवश्यक होतं. परंतु तसं न होता बांधायची म्हणून भिंत बांधून मजबुतीकरण सुरू आहे. स्थानिक आमदार शालेय शिक्षण मंत्री मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी या कामाच्या दर्जा आणि तलावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही तसेच तलावाची लांबी रुंदी आणि गोलाकार जपला जाईल याकडे स्वतःचा वेळ देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तलावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याकडे जातीने लक्ष देऊन काम करण्याची विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.