ऑईली हिरव्या तरंगामुळे मोती तलाव विद्रूप !

सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2022 12:03 PM
views 184  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहराची अस्मिता असणारा मोती तलाव ऑईली हिरव्या तरंगामुळे विद्रूप झाल्यामुळे त्यावर त्वरीत उपाययोजना करणेबाबत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी लक्ष वेधले.


सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन मोती तलाव हा शहराची अस्मिता आहे. सदर मोतीतलावाचे पाणी अशुद्ध होऊन त्यावर तेलकट हिरवा तरंग निर्माण झालेला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, तेलकट हिरव्या तरंगामुळे तलावातील पाण्यांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मासेही मरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे देखील दुर्गंधीत वाढ होत आहे. सदरचा मोतीतलाव परिसर नगरपरिषदेच्या समोरच असूनही नगरपरिषदेकडून अद्याप या प्रकरणी कोणतीही गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक व तलाव प्रेमीमध्ये नाराजी पसरलेली आहे.


तरी आपण मुख्याधिकारी या नात्याने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून तातडीने मोतीतलावाच्या पाण्यावरील तेलकट हिरवा तरंग काढून टाकून मोतीतलावातील पाणी पुर्ववत स्वच्छ होण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी नम्र विनंती सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव यांनी  आपणांस करण्यात येत आहे.