महिलांसाठी खुशखबर ! ; 'आई' धोरणामुळे उपयोजिका बनण्याची संधी !

पर्यटन व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
Edited by: ब्युरो
Published on: December 03, 2023 20:03 PM
views 233  views

सिंधुदुर्ग : पर्यटन क्षेत्रात महिलांचा अधिकाअधिक सहभाग वाढावा व त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत “आई” हे 'महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत “ महिला पर्यटन" उदयोजकांना पर्यटन व्यवसायासाठी रु.१५ लक्ष्यांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा केला जाणार आहे. हे कर्ज घेण्यासाठी पर्यटन संचलनालयाकडून पात्रता प्रमाणपत् (Letter of Intent ) देण्यात येणार असून बँकेने कर्ज देताना केंद्र शासनाच्या बँक क्रेडीट गॅरंटी योजनेमध्ये समावेश करुन घेण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत. कर्जावरील व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणिकानुसार पर्यटन संचलनालयाकडून दिला जाणार असल्याची माहिती पर्यटन संचलनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक, पर्यटन हनुमंत कृ.हेडे यांनी दिली.

पर्यटन क्षेत्रात महिलांना बुस्ट मिळावा यासाठी पर्यटन संचलनालायाकडून महिलांसाठी "आई" हे महिला केंद्रित पर्यटन धोरण आखण्यात आले आहे. महिला उदयोजकता विकास, महिलाकरिता पायाभूत सुविधा, सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने प्रवास व सवलत विकास अशी या धोरणांची पंचसुत्री आहे..

“आई” महिला केंद्रित पर्यटन धोरणात पर्यटन क्षेत्राशी निगडीत ४१ प्रकारचे पर्यटन व्यवसाय उदयोगासाठी रु. १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज पुरविले जाणार असून, महिलांनी पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in किंवा www.mtdc.co.in या संकेतस्थवरुन अर्ज डाऊनलोड करुन उपसंचालक, पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, कोकण भवन, ७ वा मजला, ऑफीस क्र. ७२१, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे अर्ज सादर करण्याचे आव्हान श्री हनुमंत कृ. हेडे, उपसंचालक (पर्यटन) यांनी केले. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:- ९४२१०५१७०८/७९७७७८७०१२ किंवा ९१३०७७३१७५ संपर्क साधावा.