मदर क्वीन्सच्या विद्यार्थ्यांचं इंटरनॅशनल रंगोत्सव स्पर्धेत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2026 18:48 PM
views 21  views

सावंतवाडी : सिं.  जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल रंगोत्सव स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्त केले. कलरींग कॉम्पीटेशनमध्ये कु मुस्तफिज बेग याने प्रथम क्रमांक, कु. तनुजा पवार हीने चतुर्थ क्रमांक तसेच कु.अथर्व मुंज याने देखील चतुर्थ क्रमांक व कु. शौर्य रांजणे याने द इसेन्ट्रीक परफॉर्मर अवॉर्ड पटकावला. हँडरायटिंग स्पर्धेत कु. अग्रजा गवस हीने द इसेन्ट्रीक परफॉर्मर अवॉर्ड प्राप्त केला. कॅरीकेचर स्पर्धेत कु. अनुनय सावंत याने द्वितीय क्रमांक, फींगर अँड थम स्पर्धेत कु. मायरा वेर्लेकर हीने चतुर्थ क्रमांक पटकावला तर कु.अमीन बेग याला द इसेंन्द्रीक परफॉर्मर अवॉर्ड मिळाला.  


रंगोत्सव आयोजित कलरींग, कॅरीकेचर , फींगर अँड थम्, हँडरायटिंग, कार्टून मेकिंग, स्केचिंग, टैटू मेकिंग, कोलाज मेकिंग, ग्रिटींग कार्ड अशा विविध स्पर्धामध्ये पाच विदयार्थ्यांना कन्सोलेशन प्राइझ, अठरा विदयार्थ्यांना इंटरनॅशनल मेडल व आठ विदयार्थ्यांना आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड मिळाले. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिकांना 'द व्हीजनरी प्रिन्सीपल अवॉर्ड' व शाळेस 'वर्ल्ड एज्युकेशन प्रेस्टीज अवॉर्ड ' ने सन्मानित करण्यात आले. 

या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.