
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल लेवल आर्ट स्पर्धेमध्ये यश संपादित केले.
इंटरनॅशनल लेवल आर्ट्स स्पर्धेमध्ये कार्टून मेकिंग स्पर्धेत कु. दीप स्वार (इयत्ता चौथी) याने द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. आयुष निर्गुण (इयत्ता सहावी) हा इंटरनॅशनल मेडलचा मानकरी ठरला. हॅन्डरायटिंग स्पर्धेत कु. ताहिरा जुनेजा (इयत्ता नववी) हीने स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स अवॉर्ड पटकावला तसेच कु. भार्गवी भाईडकर (इयत्ता पाचवी )व कु यश सावंत (इयत्ता चौथी )यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला .कलरिंग स्पर्धेत कु निधी राऊळ ( इयत्ता सहावी )हिने स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स अवॉर्ड पटकावला तर कु. साईल पालकर (इयत्ता सहावी) हा इंटरनॅशनल मेडलचा मानकरी ठरला तसेच कु रौनक मेहत्तर(इयत्ता दुसरी) याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. फिंगर अँड थंब स्पर्धेत कु. अमीन बेग (इयत्ता पाचवी )याने इंटरनॅशनल मेडल संपादित केले त्याचप्रमाणे प्रशालेस ग्लोबल स्कूल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल लेवल आर्ट्स स्पर्धेसाठी प्रशालेचे 155 विद्यार्थी पात्र ठरले होते.
या यशाबद्दल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.