मदर क्वीन्सचा पियुष निर्गुण 'युवा मास्टर स्ट्रोक'मध्ये प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2025 14:15 PM
views 60  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी पियुष नारायण निर्गुण याने 'युवा मास्टर स्ट्रोक' द्वारे आयोजित ऑल इंडिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन 2024 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उत्तुंग यश प्राप्त केले. 


या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण 40 शाळांमधील बहुसंख्य स्पर्धकांमध्ये कु पियुष निर्गुण याने आपले उत्तम कला कौशल्य सादर करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने सर्व स्तरातून पियुषवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.कु. पियुष निर्गुण हा विद्यार्थी एक हरहुन्नरी व प्रतिभावान कलाकार असून त्याने आपल्या प्राथमिक व माध्यमिक शालेय कारकीर्दीत आतापर्यंत बहुविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या कलेची चुणूक दाखवत लक्षवेधी यश संपादित केले आहे.

पियुषच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.