
सावंतवाडी : सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश, सावंतवाडी या प्रशालेने सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारा आयोजित प्राविण्य परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. विभव राऊळ याने प्राविण्य परीक्षेत जिल्ह्यात 8 वा क्रमांक पटकावला. तर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. मानसी सावळे हिने जिल्ह्यातून २५ वा क्रमांक प्राप्त केला. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. सारा नाईक हिने जिल्ह्यातून २३ वा क्रमांक संपादित केला. या सर्व विद्यार्थ्यांची निवड प्रज्ञा परीक्षेसाठी झाली आहे.त्यांच्या उत्तुंग यशाबदल सिं. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले, विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी तिचे कौतुक केले.