
कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगावात आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त केंद्र शाळा नांदगाव नं. १ येथे प्रभात फेरी काढण्यात आली व प्रतिज्ञा घेण्यात आली. जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा, नको अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी कणकवली पोलीस उपनिरीक्षक श्री शेडगे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. सावंत, कासार्डे बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, स्वप्निल जाधव, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, केंद्रशाळा नांदगाव नं. १. मुख्याध्यापक सुहास सावंत, देसाई सर, पंचश्री मोरजकर, सौ. पोकळे, सौ.वळंजू ,सौ.चव्हाण आदी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.