ड्रग्स विरोधात मळगावात प्रभात फेरी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2025 16:38 PM
views 80  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसांच्यावतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत मळगाव गावात  प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीसाठी नागरिक व विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी शपथ घेण्यात आली.     

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी मळगाव येथील नागरिकांना ड्रग्स विरोधी महिमेसंदर्भात मार्गदर्शन व अमली पदार्थ समूळ उच्चाटनासाठी सहकार्याचे आवाहन केले. यावेळी हनुमंत पेडणेकर, तसेच गावातील इतर ग्रामस्थ शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.