
सिंधुदुर्ग : सिंधुदूर्ग विभागातुन कार्तिकी यात्रेकरिता जादा पंढरपुर यात्रेस जादा बसेस मागणी प्रमाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गतवर्षी या विभागातुन 35 बसेस कार्तिकी यात्रेकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार यावर्षीदेखील सदर बसेस उपलब्ध आहेत. सदर बसेस या प्रवाशांच्या सोयीनुसार त्याचे इच्छित स्थळावरुन सोडण्यात येणार आहेत.
प्रत्येक बसमध्ये 40 आसने उपलब्ध राहणार असुन, महिलांना व 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवास दरामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच 75 वर्षांवरील व्यक्तींना प्रवास दरात 100 टक्के म्हणजे मोफत प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी प्रवाशी वर्गाने वारकरी संप्रदाय यांनी सदर सुविधांचा लाभ घ्यावा व वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची रा प महामंडळास संधी उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच किमान 30 थेट प्रवाशी उपलब्ध असल्यास प्रत्येक स्थानकावरुन थेट बस उपलब्ध करून देण्यात येईल. तरी रा.प. सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळामार्फत विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी केले आहे.