कुडाळात मॉन्सून रन मॅरेथॉन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 19, 2025 16:34 PM
views 180  views

कुडाळ :  राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन 2025तर्फे आयोजित भव्य हाफ मॅरेथॉन ही दिनांक 13जुलै 2025रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथून आयोजली असून every running step makes your heart stronger ही टॅगलाईन घेऊन 5, 10, 16 तसेच 21 किलोमीटरच्या मधून सिंधुदुर्ग सोबतच मुंबई गोवा कोल्हापूर बेळगाव पुणे रत्नागिरी इथूनही धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच या हाफ मॅरेथॉन से यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन 2025 सज्ज असल्याची माहिती टीम कुडाळ मान्सून रन यांनी स्पाइस कोकण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, डाॅ संजय केसरे, गजानन कांदळगावकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, सचिन मदने इत्यादी उपस्थित होते. 

मुंबई रोड रनर्स संस्थेकडून विशेष सन्मान

सन 2024 वर्षातील सर्वोत्कृष्ट हाफ मॅराथाॅन आयोजनाचा मानाचा सन्मान मुंबई रोड रनर्स संस्थेकडून  कुडाळ मान्सूम रन 2024 ला सन्मानित करण्यात आले आहे.

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे 2022 पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर ने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे.

हॉस्पिटल तर्फे रोटरी क्लब कुडाळ च्या सहयोगाने रक्तदान शिबिर, श्रवण दोष चिकित्सा शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर, असे बरेच कार्यक्रम राबवले जातात. 

आरोग्यसाठी चालणे किंवा धावणे हे महत्त्वाचे आहे.व्यायाम व आरोग्य या बद्दलची जनजागृती व्हावी यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित केली आहे.

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर सह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसीएशन,कुडाळ सायकल क्लब,रांगणा रनर्स,रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब,सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज आहेत. या मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे. 

     Bill Rowan medal पुरस्कार प्राप्त श्री प्रसाद कोरगावकर तसेच comrade marathon bronze medal प्राप्त  ओमकार पराडकर याबरोबर रत्नागिरीचे Iron Man डॉक्टर तेजानंद गणपत्ये, मुंबईतील Iron Man अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मान्सून रन ची शोभा वाढवेल.

   आपले हृदय चालत राहावे यासाठी आपण चालत राहण्याचा मोलाचा संदेश घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सिंधुदुर्गातील पहिल्याच होऊ घातलेल्या पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा हेच टीम कुडाळ मान्सून रन चे ध्येय आहे.

ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत.

सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जातील. कुडाळ एमआयडीसी मधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल.

5 किमी ची फन रेस असणार आहे यामध्ये रोख बक्षिस नसणार आहे .पण टी शर्ट व डिजीटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे.10 किमी ,16 किमी व 21 किमी प्रकारात वयोगटानुसार आकर्षक रोख बक्षिसे व खुल्या गटासाठीही रोख आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत चा निसर्ग रम्य रस्ता आपल्या पावलांच्या चळवळीसाठी वाट बघतोय. सहभागी होण्याकरता दूरध्वनी क्रमांक 09421261212 वर संपर्क साधावा किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करावी.