
मुंबई : चार दिवासांपासून गोव्यात अडकलेला मान्सून गुरुवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजता तळकोकण ओलांडून पुढे आला. दुपारी ४ पर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलपुर शहरे काबिज केली होती. आगामी काही तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदा तो राज्यात नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशीरा दाखल झाला आहे.
हवेचे दाब अनुकूल होताच मान्सून गुरुवारी ६ जून रोजी राज्यात दाखल झाला. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली शहरात आला. तशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने गुरुवारी दुपारी ४ वाजता केली. आगामी १२ ते १६ तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून ७ ते ९ जूनपर्यंत राज्यात मुसळधारेचा अंदाज दिला आहे.