
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार पासून मान्सूनचे आगमन झाले असून, शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हा दिनांक ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून टोल फ्री क्रमांक १० ७७ मोबाईल क्रमांक ७४९८०६७८३५ व दूरध्वनी क्रमांक झिरो ०२३६२- २२८८४७ या नंबर वर आपत्कालीन सिरीज संपर्क साधावा असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालया ठिकाणी ही नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.
या काळात मुसळधार पाऊस तसेच पन्नास ते साठ किलोमीटर वेगाचे वारे वाहणार असून विजा चमकण्याचे प्रमाण मोठे असणार आहे. याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सर्व मत्स्य सहकारी संस्था, नौका मालक, मासेमार बांधव यांना कळविण्यात येते कि, *दिनांक 07/06/2024 ते दिनांक 11/06/2024या कालावधीत 35 ते 45 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग 55 पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, तरी यांत्रिक व यंत्रचलित नौकांनी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे पालन करावे. तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारे सह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्हातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात यावी.* नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. असे आवाहन व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.