
देवगड : देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत यांच्या कडून मोंड हायस्कूल विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. मोंड ग्रामपंचायत यांच्या कडून मोंड हायस्कूल मधील इ. 5 वी ते इ.10 वी च्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता.हा कार्यक्रम मोंड हायस्कूल मध्ये करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सरपंच शामल अनभवणे व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक आचरेकर मॅडम याच्या हस्ते दफ्तर वाटप कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळी मों.पं. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष गणेशजी राणे, सचिव, अभय बापट, तसेच इतर पदाधिकारी व संचालक शाळेच्या मुख्याध्यापक आसावरी कदम मॅडम सर्व शिक्षक- शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे कौतुक केले.त्यानंतर मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानले.










