मोहिनी मडगांवकर यांच्या वाढदिनी रक्तदान शिबीर..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 27, 2023 16:57 PM
views 173  views

सावंतावडी : "ह्युमन राईट्स फाॅर प्रोटेक्शन" च्या सावंतवाडी कार्याध्यक्षा, भाजप महिला अध्यक्षा तसेच "घे भरारी फाऊंडेशन," सावंतवाडीच्या संस्थापक अध्यक्षा तथा "लायन्स क्लब आॅफ सावंतवाडी" सदस्या मोहिनी मडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त घे भरारी फाऊंडेशन, सावंतवाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा - सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत काॅटेज हाॅस्पिटल, सावंतवाडीच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन या दैवी कार्यात सहभाग घ्यावा, अशी आवाहनपर विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.