मोदी @ 9 ; भाजपच्या माध्यमातून ३० जूनपर्यंत विविध उपक्रम

अनुचित जाती समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची माहिती
Edited by: विनायक गावस
Published on: June 08, 2023 16:15 PM
views 92  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी ९ वर्षांच्या कारकीर्दी मधील विविध योजना तळागाळा पोहोचवण्यासाठी भाजपाच्या सात सेलच्या माध्यमातून महिनाभरामध्ये तळागाळात जाऊन प्रसार केला जाणार आहे आणि लाभार्थ्यांनी योजनांची संधी घ्यावी म्हणून आव्हान करण्यात येणार असल्याची माहिती अनुचित जाती समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.  येथील भाजपा कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत जाधव यांनी माहिती दिली. यावेळी किसान सेलचे जिल्हा सरचिटणीस अजय सावंत ,परीक्षित मांजरेकर ,विनोद सावंत ,वासुदेव जाधव  आदी उपस्थित होते.

 यावेळी चंद्रकांत जाधव म्हणाले, भाजपाच्या किसान ,महिला, युवा ,विमुक्त भटक्या, आघाडी अशा सात सेलच्या माध्यमातून येत्या ३० जून पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दी मधील विविध योजना तळागाळात पोचविल्या जाणार आहेत. या सातही मोर्चा संघटनांना एकत्रित करून अभिनव असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या महिन्याभरात मोटरसायकल रॅली, बुथनिहाय बैठका, घरोघरी भेट घेऊन माहिती देणे, बुद्धिवंत संमेलन ,व्यापारी संमेलन, जेष्ठ कार्यकर्ते बैठका,मन कि बात अशा विविध बैठकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना तळागाळात पोहोचविल्या जाणार आहेत असे जाधव यांनी सांगितले 

जनतेत जाऊन या योजना पोहोचवितानाच त्यांना लाभ मिळावा म्हणून देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, नाट्यकर्मी, कलाकारांचा सत्कारही करण्यात येणार आहे. योजना तळागाळात पोचवणे आणि मान्यवरांचा सन्मान करणे असे अभिप्रेत कार्य येत्या ३० जून पर्यंत करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये भारताची मान उंचावली असून गोरगरीब सर्व स्तरातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत असे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रत्येकाचीच मान उंचावली जाईल असे काम केले आहे असे जाधव यांनी सांगितले.