मोदी @9 अभियान ; निलेश राणे शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 29, 2023 18:42 PM
views 155  views

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण तालुक्यात मोदी @९ अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियांनांतर्गत निलेश राणे यांनी तालुक्यातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांच्याशी  संवाद साधला. निलेश राणे आपल्या घरी आल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. 


मोदी @९ अभियान अंतर्गत कुडाळ, मालवण मतदार संघात शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून घरो घरी संपर्क अभियान विधानसभा मतदारसंघात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख असलेले निलेश राणे कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन भेट देत असून या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेतला जात आहे. गुरुवारी मालवण तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ शहरातून करण्यात आला. शहरात मेढा येथील माजी नगरसेवक शक्ती केंद्र प्रमुख गणेश कुशे यांच्या निवासस्थानापासून दौऱ्याला सुरुवात झाली. या दौऱ्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तसेच 9 वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या दौऱ्यात भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, प्रभारी संजू परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मालवण तालुका  अभियान प्रमुख आप्पा लुडबे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, बबलू राऊत, राजू परुळेकर, अशोक तोडणकर, आबा हडकर,  विक्रांत नाईक, ललित चव्हाण, नारायण लुडबे, यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


शहरातील पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, या शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन या अभियानाची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागातील वायरी मंदार लुडबे, देवबाग राम चोपडेकर, कुंभारमाठ अशोक चव्हाण, देवली विरेश मांजरेकर, पेंडूर आतिक शेख, वराड राजन माणगावकर, कट्टा महेश वाईरकर या  शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांनी माहिती दिली. यावेळी हरेश गावकर, भाई मांजरेकर, संदेश तळगावकर, संजय लुडबे, संजीवनी लुडबे, मनोज खोबरेकर, संजय नाईक, सुमित सावंत, अमित सावंत, सुरेश चौकेकर, यासह कार्यकर्ते उपस्थित होते.