
सावंतवाडी : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने सायरन अलर्ट व रंगीत तालीम देण्यात आली. कोणत्याही क्षणी हवाई हल्ले झाल्यास स्वतःची काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शनही उपस्थित नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आले.
या रंगीत तालमीत नगरपालिका प्रशासन पोलीस महसूल आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित स्थळी कसे जावे यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर हल्ला झाल्यानंतर जखमींना कशाप्रकारे उपचार देण्यात यावा किंवा उपचारासाठी घेऊन जावे याबाबतचे ही प्रत्यक्ष दाखवण्यात आले.
सावंतवाडी पालिका हद्दीत आणि बाजारपेठेत ही रंगीत तालीम पार पडली बाजारपेठेतील विक्रेत्या महिला व तसेच नागरिकांना या रंगीत तालमीत समाविष्ट करून त्यांना आवश्यक त्या देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी मार्गदर्शन केले दोन वेळा सायरन अलर्ट वाजला यात अति धोक्याचा आणि सुरक्षितेचा अशा दोन प्रकारांमध्ये सायरन अलर्ट वाजवण्यात आला. दुपारी चार वाजता एकदा आणि चार वाजून पंधरा मिनिटांनी दुसरा सायरन अलर्ट वाजवण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्यासह तहसीलदार श्रीधर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर गिरीश चौगुले डॉक्टर वजराटकर डॉक्टर सागर जाधव यांच्यासह श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे एनसीसी चे विद्यार्थी व नगरपालिकेचे अधिकारी वर्ग व कर्मचारी सहभागी झाले होते.