मनसेची 'एक सही संतापाची'

Edited by: विनायक गावस
Published on: July 09, 2023 15:20 PM
views 201  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात एक सही संतापाची हे आंदोलन करण्याचे आदेश दिले होते आज सावंतवाडी मनसेच्या वतीने एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय चिखलमय परिस्थिती पाहता जनतेने आपला रोष व्यक्त करावा यासाठी ही सह्यांची मोहीम राबविण्यात आली आज सावंतवाडीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सहयांच्या माध्यमातून नागरिकांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आपला रोष व्यक्त केला.

तसेच उद्या गांधी चौक येथे अभियानाची सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी जनहित विधीकक्ष जिल्हा संघटक अनिल केसरकर माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर मनविसे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे सतीश आकेरकर अतुल केसरकर प्रवीण गवस राकेश परब साहिल तळकटकर तसेच मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.