
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत मनसे तर्फे आज १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र काल संध्याकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सोबत चर्चा केली. या आश्वासनाअंती उपोषण स्थगित करण्यात आले.
या उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत तसेच डॉक्टरांची रिक्त असलेली पदे व अन्य समस्यांबाबत विस्तृत चर्चा केली. या प्रश्नी स्वतः लक्ष घालत असून मनसेने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने येत्या दिनांक २० ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे या रुग्णालयातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुधिर राऊळ, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.