आरोग्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल : अॅड. अनिल केसरकर

Edited by:
Published on: December 01, 2023 14:20 PM
views 60  views

सावंतवाडी : जिल्ह्याला तीन-तीन मंत्री लाभले असताना देखील आरोग्याची अवस्था जर सुधारत नसेल तर येणाऱ्या काळात मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांनी आज येथे दिला. दरम्यान मनसेत कोणतीही गटबाजी नसून सर्वजण आम्ही एकत्रच आहोत असे देखील अॅड. अनिल केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी श्री केसरकर पुढे येणाऱ्या काळात होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणण्याचा मी काम करेल त्यासाठी जास्तीत जास्त नाव नोंदणीचे करणार असल्याचे देखील श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. कोकण पदवीधर मतदार संघाचे अभिजित पानसे अभिराज जाधव यांची उपस्थिती लाभली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेला उमेदवार निवडून आणणार. पदवीधर नोंदणी करण्याचे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी केले. मनसे जिल्हा व तालुका कार्यकारिणी राज ठाकरे यांनी जाहीर केली. गटतट नाही सर्व जण एकच आहोत.गटतट थांबवायचे आहे एकमत करायचे आहे.

आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आता पर्यत आंदोलने केली तीन तीन मंत्री आहेत मात्र त्यांनी दुर्लक्ष होत आहे.आता उग्र आंदोलन छेडणार रिक्त पदे,ब्लड बँक प्रश्न आहेत डॉ येत नाहीत रूग्ण सेवा सुधारणा करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यावेळी अँड. अनिल केसरकर (जिल्हाध्यक्ष), सुधीर राऊळ (उपजिल्हध्यक्ष), अँड. राजू कासकर (परिवहन जिल्हाध्यक्ष), मिलिंद सावंत (सावंतवाडी तालुकाध्यक्ष),  गुरुदास गवंडे (विधानसभा सचिव), अतुल केसरकर, विष्णू वसकर, पांडुरंग बुगडे, जय राऊळ, काशिराम गावडे, नरेश देऊलकर (ग्रा.पं. सदस्य, आरोंदा), चिन्मय नाडकर्णी, श्रीराम सावंत, जय सावंत, केतन सावंत, सत्यवान सावंत,श्रीराम सावंत, अंकुश सावंत आदी उपस्थित होते.