
सावंतवाडी : कुणकेरी होणाऱ्या विजेच्या समस्यांनी लोकांना होतोय नाहक त्रास लोकांचे हे प्रश्न घेऊन मनसेचे सुधीर राऊळ, केतन सावंत व कार्यकर्त्यांनी विचारला विज महावितरण अधिकारी भुरे, बोत्रे यांना जाब विचारला.
कुणकेरी गावामध्ये लाईटचा नाही समतोल नागरिकांना व लाईट मन यांना या सर्व समस्याना सामोरे जावे लागत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते तेथील नागरिकांच्या समस्या दूर करत आहेत. पण तेथील नागरिकांना व लाईट मनांना होणाऱ्या त्रासाबद्दल दखल घेतली जात नाही. गावातीलं काही ट्रान्सफॉर्मर वरील पेटी गंजून गेल्या आहेत. तेथे भर वस्तीत मुले फिरत असतात. काही ट्रान्सफॉर्मर रस्त्या लगत आहेत. त्यावेळी तेथील जाणाऱ्या नागरिकांना धोकादायक ठरू शकतो. काही ट्रान्सफॉर्मर वरील गंजलेल्या व तुटलेल्या पेटी ,व तुटलेल्या फ्युज, लवकरात लवकर बदली करण्यात यावे व गावातील दिलेल्या वायरमन सोबत त्यांच्याबरोबर एक सहाय्यक वायरमन द्या अशी मागणी मनसे पदाधिकारी केतन सावंत यांनी केली आहे . यावर लवकर तोडगा काढावा आणि ही कामे पावसा पूर्वी करावी. अशी मागणी मनसेचे केतन सावंत यांनी केली आहे.










