संघटना बळकट करण्याचा मनसेचा निर्धार

देवगडात सभा
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 01, 2024 20:13 PM
views 234  views

देवगड : देवगड तालुका मनसेची सभा तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत विधानसभा निवडणूकीच्या पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी केला. तसेच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका ताकदीने लढवाव्यात यावर सर्वांचे एकमत झाले.

तसेच महिला शहर अध्यक्ष पदी ममता धुरत,नगरपंचायत वार्ड क्र. 6 विभाग अध्यक्ष पदी राजन तेली, पोयरे विभाग अध्यक्ष पदी रविंद्र लाड, मोंड शाखा अध्यक्ष पदी संतोष चौघुले , नाडन शाखा पदी समीर पुजारे यांची निवड करण्यात आली..

यावेळी तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, शहर अध्यक्ष सचिन राणे मनविसे तालुका अध्यक्ष पप्पु जाधव, मनविसे शहर अध्यक्ष अभिजीत तेली, कातवण विभाग अध्यक्ष नंदकुमार हडकर, कातवण शाखा अध्यक्ष तेजस खोत, नगरपंचायत कामगार पुरुषोत्तम घाडी, तसेच महाराष्ट्र सैनिक अजय कातवणकर, प्रथमेश परब  उपस्थित होते..