
सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वरेनिअम क्लाऊडला धडक देण्यात आली. या संस्थेन स्थानिक युवकांच रखडवलेल मानधन द्यावं, अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशारा मनसेनं दिला होता. याप्रमाणे मनसेनं आज धडक देत संबंधितांना जाब विचारला.
यावेळी जिमखाना येथील कार्यालयात पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मनसे स्टाईलन धडक देत संबंधितांना जाब विचारला गेला. स्थानिक युवकांचं मानधन अदा करा अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेला असा इशारा मनसैनिकांनी दिला.
यावेळी बुधवारी पगारचे पैसे युवकांना देणार असल्याचे संस्थेकडून कबुल करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, शहराध्यक्ष अँड. राजू कासकर,अतुल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंतआदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.