
कणकवली : कनेडी राडा प्रकरणात शिवसेना-भाजपच्या 10 जणांना अटक झाली आहे. पोलिसांनी रात्री 2 वाजता ही कारवाई केली आहे. कनेडी राड्याला 15 दिवस झाले होते पण कारवाई होत नव्हती. 24 जानेवारीला हा भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांत राडा झाला होता. यानंतर तब्बल १५ दिवसानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या राड्यात आमदार वैभव नाईक यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल आहे. मात्र अद्यापपर्यंत वैभव नाईकांवर कारवाई झालेली नाही. मात्र अटकेची टांगती तलवार असून कुठल्याही क्षणी अटक होवू शकते. यामुळे कणकवलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे.