हनुमान क्रीडा मंडळ व्यायामशाळेचे शेखर निकमांच्या हस्ते भूमिपूजन

Edited by: मनोज पवार
Published on: October 08, 2024 07:32 AM
views 114  views

संगमेश्वर : तालुक्यातील कोंड भराडे कुंभारखाणी बुद्रुक येथे जय हनुमान क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या व्यायामशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उभारला असून आमदार निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

भूमिपूजन सोहळ्यादरम्यान आमदार शेखर निकम यांनी नवयुवकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, लोकवर्गणीद्वारे सहकार्य केलेल्या सर्व लोकांचेही आभार मानत ही इमारत उभारण्याचे स्वप्न साकार होत असल्याने आनंद व्यक्त केला. व्यायामशाळेबरोबरच, शेजारी छोटेसे ग्रंथालय व्हावे असे सर्व ग्रामस्थ व नवयुकांना सांगितले त्यासाठी प्रयत्न करावे यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.

याचवेळी आमदार निकम यांनी कोंड भराडे परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्याचा शब्द दिला.

यावेळी विकास सुर्वे (मा. उपसभापती), वंदना सुर्वे (सरपंच), अनिल सुर्वे (उप-सरपंच), सुजित सुर्वे, संदिप सुर्वे, सतिश सुर्वे, कृष्णकांत सुर्वे, रमेश सुर्वे, दिपक सुर्वे, संजय सुर्वे, रुपेश शिंदे, गुणाजी साळवी, प्रतिक सुर्वे, तानाजी सुर्वे, अनंत सुर्वे, अमित देसाई, परशुराम सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, दिलीप सुर्वे, राजेंद्र सुर्वे, अनिल सुर्वे, शंकर सुवरे, सुरेश तांदळे, केशव शितप व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.