आमदार शहाजी बापू पाटील यांचं संजू परब यांनी केलं जंगी स्वागत !

संजू परब यांच्या जगदंब निवासस्थानी दिली भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: October 15, 2022 18:25 PM
views 343  views

सावंतवाडी : बाळासाहेबांची शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांचं भाजप नेते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी कोकणात येताच जंगी स्वागत केले. सावंतवाडी गवळी तिठा इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत बापूंच स्वागत केले. यानंतर त्यांनी संजू परब यांच्या जगदंब निवासस्थानी भेट दिली. यावेळी संजू परब व सौ. संजना परब यांनी  त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सौभाग्यवती सौ.संजना परब उपस्थित होत्या.