आमदार नितेश राणेंच्या हस्ते पियाळीत विकासकामांचा धडाका

आमदार नितेश राणेंच्या हस्ते 65 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन माजी उपसभापती संतोष कानडेंच्या पाठपुराव्याला यश
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 13, 2023 10:28 AM
views 107  views

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी पियाळी गावातील विविध विकासकामांसाठी 65 लाखांचा निधी दिला असून या विकासकामांचे भूमिपूजन आज आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले.भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी या विकासकामांसाठी पाठपुरावा केला होता. पियाळी स्वयंभू मंदिर ते तेलिवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण,  तेलीवाडी ते शिवगंगा नदीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण, तेलिवाडी येथे सार्वजनिक विहीर ही पायाभूत विकासकामे या निधीतून जनतेसाठी करण्यात येणार आहेत. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पं स उपसभापती संतोष कानडे, पियाळी सरपंच पन्हाळकर, उपसरपंच सर्व ग्रा पं सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते