
देवगड : देवगड तालुक्यात आयोजित युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी भेट देत उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.
आमदार निलेश राणे म्हणाले, देवगडमधील युवकांमध्ये अपार कला आणि नेतृत्वगुण आहेत. या उर्जेला योग्य दिशा मिळाली तर ते समाज परिवर्तनाचे शिल्पकार ठरतील. तरुणांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन हवे असल्यास शिवसेना हीच खरी ताकद आहे.संजय आंग्रे यांनीही तरुणांना संघटन, शिस्त आणि समाजसेवा या तीन तत्त्वांवर आधारित कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणाईला शिवसेनेच्या विचारधारेत सहभागी होऊन जनतेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला संदेश सावंत - पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, नगराध्यक्ष सौ. साक्षी प्रभू, अमोल लोके तसेच युथ फोरमचे पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रणव नलावडे, सागर गावकर, श्रुती माणगावकर, ओंकार सारंग, आजा कोयडे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर आदी युवकांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.










