
कुडाळ: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. याच अनुषंगाने, आमदार निलेश राणे यांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. वाळके यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर त्यांचे वाळके परिवाराने स्वागत केले. निलेश राणे यांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वाळके, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, शिवसेना मागासवर्गीय तालुका प्रमुख विजय जाधव आणि निलेश वाळके यांच्यासह वाळके परिवारातील सदस्य उपस्थित होते.










