LIVE UPDATES

आमदार निलेश राणे यांची 'कोकणसाद'ला सदिच्छा भेट

मुख्य संपादकपदी निवड झाल्याबद्दल सागर चव्हाण यांना दिल्या शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2026 17:45 PM
views 129  views

सावंतवाडी : कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE व दैनिक कोकणसादच्या प्रधान कार्यालयाला शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते, आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची मुख्य संपादक सागर चव्हाण व मुख्य उपसंपादक जुईली पांगम यांनी मुलाखत घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, गुरू मठकर, बंटी पुरोहित, कोकणसादचे चीफ रिपोर्टर विनायक गांवस, मुख्य उपसंपादक जुईली पांगम, मुख्य उपसंपादक स्वप्नील परब, उपसंपादक लक्ष्मण आढाव, आयटी हेड विद्देश धुरी, सिनीअर व्हिडिओ एडीटर प्रसाद कदम, मयुरेश राऊळ, डीटीपी ऑपरेटर अविनाश बांदेकर, रविकिरण राणे, वितरण प्रतिनिधी अश्फाक शेख, व्हिडिओ जर्नालीस्ट साहिल दहिबावकर आदी उपस्थित होते.