LIVE UPDATES

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण | भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 13, 2026 18:35 PM
views 17  views

कुडाळ : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना कुडाळच्या वतीने शहरात एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने संपूर्ण कुडाळ शहरात तब्बल ५००० झाडांची भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या व्यापक मोहिमेचा रीतसर शुभारंभ माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिर परिसर येथे वृक्षारोपण करून अत्यंत उत्साहात करण्यात आला.

कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवणे, निसर्गाचा समतोल राखणे आणि वाढते प्रदूषण रोखणे या उदात्त उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत पर्यावरणास पूरक असणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बेल, आवळा, जरूळ, करंज, महोगनी, शेवगा, बहवा, चिंच, कुसुमी, कांचन आणि पळस यांसारख्या विविध प्रजातींच्या बहुगुणी झाडांची लागवड करण्यात येत आहे.

या पर्यावरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील शिवसेना आणि युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने: मंदार शिरसाट (युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक), कृष्णा धुरी (शिवसेना तालुकाप्रमुख), राजन नाईक (तालुकाप्रमुख), बबन बोभाटे (तालुका संघटक), नीनाक्षी शिंदे (युवतीसेना जिल्हाप्रमुख), गंगाराम सडवेलकर ( जि. प. सदस्य), योगेश धुरी (युवासेना तालुकाप्रमुख), अतुल बंगे (कुडाळ संपर्कप्रमुख), या मोहिमेला गती देण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, उपशहर प्रमुख गुरु गडकर, शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, उपशहर प्रमुख शैलेश काळप, शाखाप्रमुख पप्या धुरी, संतोष अडुळकर, विनय पालकर, केदार काळप, महेश राहुल, प्रकाश कांबळे, हर्षद काळप, संजय बोभाटे, महेश कांबळे, ज्येष्ठ नागरिक भाऊ पाटणकर, प्रथमेश राणे, सतीश कुडाळकर, नितीन सावंत, वकील शिवप्रसाद सामंत यांच्यासह कुडाळ शहरातील असंख्य शिवसैनिक, युवा सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त थेट निसर्गाशी नातं जोडणारा आणि शहराच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचा असणारा हा ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प कुडाळवासीयांकडून कौतुकाचा विषय ठरत आहे.