आमदार निलेश राणेंच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची उभारणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 06, 2025 15:39 PM
views 218  views

मालवण : शिवस्वराज्य दिन निमित्ताने मालवण पंचायत समिती येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची उभारणी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच स्वराज्य गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला. 

यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, स्वरूप वाळके यांसह पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, आमदार निलेश राणे यांचा गटविकास अधिकारी दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांसह सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.