आ. निलेश राणेंनी केलं सावंत कुटुंबीयांचं सांत्वन

Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2025 20:44 PM
views 256  views

सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक शिक्षण महर्षी विकास सावंत यांचे अलीकडेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विकासभाई यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांच्यासह सावंत कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. 

     

कै. विकास सावंत यांचे राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य फारच मोठे होते. त्यांच्या रूपाने एक जवळचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत आ. निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना पदाधिकारी विनोद सावंत, युवा सेनेचे पदाधिकारी ओमकार सावंत, निखिल सावंत, संकल्प धारगळकर तसेच राजू राणे व रामदास निलख यांच्यासह सावंत कुटुंबीय उपस्थित होते.