
वेंगुर्ले : जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे वडील प्रकाश दळवी यांचे काल शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास निधन झाले. आज शनिवारी त्यांच्यावर वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कुडाळ - मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी आज सकाळी मनिष दळवी यांची होडावडे येथे भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रकाश दळवी यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला.
यावेळी डॉ. बाणवलीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, विद्याधर परब, शर्वाणी गावकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, महेश सारंग, सुजाता पडवळ, वसंत तांडेल, दादा केळुस्कर प्रितेश राऊळ, महेश सामंत, निलेश सामंत यांच्या सहित विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.