
सावंतवाडी : मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य विद्यालय मांडकुली- केरवडे ता.कुडाळ प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाला, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी मतदार संघाचे विद्यामान आमदार दीपक केसरकर, प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक रॉबर्ट डिसोजा, संस्था अध्यक्ष श्रीधर पेडणेकर, सचिव अंकुश जाधव, खजिनदार देवदत चूबे, कार्याध्यक्ष वामन गावडे, संचालक मोहन भोई( निवृत BDO) , विष्णू परब , सचिन ठाकूर, हरिश्चंद्र जाधव, केशव पेडणेकर, करिष्मा भोई , केरवडे संरपंच श्रीया ठाकूर, मांडकुली सरपंच गौतमी कासकर माजी अध्यक्ष सगूण पेडणेकर , निवृत्त गणित शिक्षक गिरीश सरवटे, केरवडे पोलिस पाटील अजिंक्य जाधव पालक व ग्रमास्थ मोठया संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. मुख्याध्यापक खोत यांनी प्रास्ताविक करून प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. संच मान्यता जाचक अटीबाबत केसरकर यांना माहिती दिली. यानंतर आम. केसरकर यांच्या हस्ते मुलांनी तयार केलेल्या 'शब्दकुंज' हस्तलिखिताचे प्रकशन झाले. त्यांनी शालेय परिसर, गुणवता व निकालाबाबत प्रशालेचा गौरव केला. संच मान्यता निकष सिंधुदुर्ग- रत्नागीरी जिल्ह्यासांठी बदलले जातील असे आश्वासीत कले. यानंतर कार्याध्यक्ष वामन गावडे, खजिनदार देवदत्त चुबे, संस्था अध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ तालुका निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव उपस्थित होते. संस्थेच्यावतीने केसरकर, तहसीलदार जाधव, सेवानिवृत शिक्षक रॉबर्ट डिसोजा, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाबाजी भोई, संचालक विष्णू परब, विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारा विद्यार्थी कुमार कुणाल लाड यांचा संस्था व विद्यालय यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वर्षीचा आदर्श विद्यार्थी सौजन्या खोत, उत्कृष्ट खेळाडू कुमार कुणाल लाड, व कुमारी राधिका गांवकर यांना गौरवण्यात आले. शालांत परीक्षेत तसेच सहशालेय विविध स्पर्धा खेळ यामध्ये उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तुरुपात संस्था व ग्राम पंचायत मांडकुली यांचेकडून बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गोवेकर, अवाहलवाचन प्रज्ञा रांगणेकर, बक्षीसे यादीचे वाचन राहूल कानडे तर आभार प्रदर्शन संस्था सचिव अंकुश जाधव यांनी मानले.










