दोडामार्गमध्ये १७ व १८ फेब्रुवारीला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: February 09, 2024 15:01 PM
views 83  views

दोडामार्ग :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग मध्ये आमदार चषक २०२४ या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलं आहे. १७ व १८ फेब्रुवारीला ही स्पर्धा होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यांमध्ये १७ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी रोजी ही राज्यस्तरीय आमदार चषक कब्बडी स्पर्धा होणार आहे. यामध्ये कोल्हापूर गोवा आणि सिंधुदूर्ग मधील निमंत्रित संघ भाग घेणार आहेत. हि स्पर्धा दोन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी तालुकास्तरीय तर दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिम्मीत आमदार चषक हे प्रत्येक संघासाठी एक पर्वणी असणार आहे. 

तालुकास्तरीय स्पर्धेसाठी बक्षिसे -

१) प्रथम १०,००० आणि चषक

२) द्वितीय ७,००० आणि चषक

३) तृतीय २,००० आणि चषक

४) चतुर्थ २,००० आणि चषक


राज्यस्तरीय स्पर्धेची बक्षिसे

१) प्रथम २१,००० आणि चषक

२) द्वितीय १९,००० आणि चषक

३) तृतीय २,५०० आणि चषक

४) चतुर्थ २,५०० आणि चषक

अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, दादा देसाई, रामदास मेस्त्री, तिलकांचन गवस, विठोबा पालयेकर, सूर्यकांत गवस यांसह दोडामार्ग कब्बड़ीचे पंच प्रदीप गावडे, सुमित दळवी, जनार्दन पाटील  व गोंधळी सर आदि पदाधिकारी उपस्थित होते.