पणदूरात 'एमकेसीएल'चा रौप्यमहोत्सव उत्साहात

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 21, 2025 15:45 PM
views 89  views

 कुडाळ : सोहम कॉम्प्युटर पणदूर येथे एम.के.सी.एल.चा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.   एकविसाव्या शतकात युवांचे भवितव्य ज्ञानमय समृध्दीने उज्ज्वल करणारी संस्था अशी एम. के.सी.एल. ची सार्थ ओळख लोकमानसात रुजली आहे. MS-CIT अभ्यासक्रमाची नाममुद्रा तर राज्याच्या घराघरात पोहोचली आहे. दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी  आपली एम. के.सी.एल.ने  24 वर्षांची अभिमानास्पद वाटचाल पूर्ण करुन आपल्या सर्व अधिकृत अध्ययन केंद्रांसह 25 व्या वर्षात पदापर्ण केले. सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन पणदूर हे एम. के.सी.एल. चे अधिकृत अध्ययन केंद्र गेली 20 वर्षे पणदूर येथे सुरु आहे.

यानिमित्त सोहम कॉम्प्युटर पणदूर येथे  डॉ. अरुण गोडकर, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ पांडुरंग साईल,रमेश कांबळे, संतोष पालव, पत्रकार गुरुप्रसाद दळवी, विद्यार्थीनी विनिता निकम यांचा संस्थेतर्फे शाल श्रीफळ आणि गुलाबाचे झाड देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी संजय वेतुरेकर, सोहम कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका पूजा वेतुरेकर, माजी उपसरपंच शिवराम पणदूरकर राजाराम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. अरुण गोडकर बोलताना म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील  आर्टिफिशियल इंटेलिजंट पहिला जिल्हा झाला आहे. त्यामुळे आज  कॉम्प्युटर अत्यंत गरजेचा झाला आहे. त्यामुळे मुलांनी मोबाईलकडे न वाळता कॉम्प्युटरकडे लक्ष द्यावा असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. 

यावेळी संजय वेतुरेकर,पत्रकार गुरुप्रसाद दळवी, डॉ गिरीश बोर्डवेकर यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी मा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच एमकेसीएलचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सुरू असलेला लाईव्ह कार्यक्रम उपस्थितांना दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा वेतुरेकर यांनी केले तर आभार प्राचार्य राजाराम सावंत यांनी मानले.