प्रसाद लोके हत्या प्रकरण ; मिठबांव ग्रामस्थ सोमवारी घेणार पोलीसांची भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 24, 2023 13:41 PM
views 365  views

देवगड : मिठबाव येथील प्रसाद लोके याचा कट रचून हत्या केल्या प्रकरणी त्या कटात सामील असणाऱ्या त्या दिवशी प्रसाद लोकेचा पाठलाग करणा-या बुरखाधारी दोन व्यक्तींचा शोध घेण्यात यावा अशी मागणी पोलीसांकडे करणार असल्याचे मिठबाव सरपंच भाई नरे यांनी माहीती दिली आहे.

मिठबांव येथील प्रसाद लोके याच्या निर्घुण हत्येप्रकरणी मिठबांव ग्रामस्थ सोमवारी पोलीसांची भेट घेणार असून निवेदन देणार आहेत. यामध्ये प्रसाद लोके याचा खुन होण्यापुर्वी पहाटे त्याचा गाडीचा पाठलाग करणा-या बुरखाधारी दोन मोटरसायकलस्वारांचा पोलीसांनी शोध घ्यावा व खुन प्रकरणातील संशयीत किशोर पवार याचेवर सौ.मनवा प्रसाद पवार हीला आत्महत्येप्रकरणी प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे भाई नरे यांनी सांगीतले. मिठबांव येथील प्रसाद लोके याच्या निर्घृण खुनानंतर मालवण कुंभारमाठ येथील कीशोर पवार याला पोलीसांनी अटक केली. संशयीत आरोपींची पोलीस कोठडीची मुदत सोमवारपर्यंत आहे. यामुळे सोमवारी सकाळी मिठबांव ग्रामस्थ देवगड पोलीसांची भेट घेवून निवेदन देणार आहेत अशी माहीती भाई नरे यांनी दिली. यावेळी प्रसाद लोेके याच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या संशयीत आरोपी कीशोर पवार याच्या मोबाईलवर घटनेपुर्वी ६ तासापर्यंत कोणा कोणाचे फोन आले होते व कोणा कोणाला कॉल केले होते. यांचे तपशील तपासून संबंधीत व्यकती घटनेच्या वेळी कोठे होत्या त्याची माहिती घेतली का?, परस्थितीजन्य पुराव्याच्या खटल्यांमध्ये गुन्ह्याचा उद्देश सर्वात महत्वाचा असतो, तो शोधला गेला आहे का? व त्याबाबतचे पुरावे सापडले आहेत का? प्रसाद याला कॉल केल्यानंतर संशयीताने अन्य कोणत्या व्यक्तिंसोबत बोलणे केले आहे. कीशोर पवार यांचेसह अन्य व्यकती सहभागी होत्या. त्याबाबत तपास केला असल्यास कीती जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रसाद याच्या डोक्यावर वजनदार व धारदार अशा दोन प्रकाराच्या हत्याराने घाव झाल्याचे दिसून येत होते त्यापैकी कीती हत्यारे पोलीसांनी जप्त केली आहेत. लोके कुटूंबाला संशयी त कीशोर पवार याच्या कुटूंबाकडून व मित्रमंडळीकडून धोका आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच सौ.मनवा प्रसाद लोके हि च्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कीशोर पवार याच्याविरूध्द स्वतंत्र भा.द.वी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व यावर सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पोलीसांकडे करणार असल्या बाबतची माहीती मिठबाव सरपंच भाई नरे यांनी दिली आहे.