
सावंतवाडी : मिशन आधार सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून पक्षी व प्राण्यांना कडक उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी यासाठी 'मिशन जीवन' हा उपक्रम सावंतवाडीत राबविण्यात आला. यावेळी शहरातील तसेच परिसरातील अनेक भागात प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. मळगाव घाटी, शिल्पग्राम रोड, सावंतवाडी मच्छीमार्केट, पाटबंधारे कार्यालय, चराठा कॉलनी आदी ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली. यावेळी सावंतवाडी नगरपरिषद उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, तसेच मिशन आधारचे उपाध्यक्ष आनंद पुनाळेकर, प्रसाद नाडकर्णी, वैभव घाग, ऋषिकेश खानोलकर, वामन सावंत, तुषार रेमुळकर, ओमकार शिरोडकर, सोनाप्पा गवळी आदी उपस्थित होते.